Lonavala : अग्रसेन महाराजांची जयंती उत्साहात 

एमपीसी न्यूज –  लोणावळ्यातील अग्रवाल व अग्रेसन समाजाच्या वतीने अग्रसेन महाराज यांची 5041 वी जयंती लोणावळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी दुपारी लोणावळा मुख्य बाजारपेठेतून ढोलताशांच्या निनादात अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. परिसरातील अग्रवाल समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. जयंतीनिमित्त अग्रवाल समाज व बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांकरिता स्तन‍ाचा कर्करोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी विविध नृत्यस्पर्धा, मुलांकरता फॅन्सी ड्रेस, सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता समाजाचे अध्यक्ष आशुतोष अग्रवाल, सचिव पियुष अग्रवाल व अमोल रामगोपाल अग्रवाल यांनी विशेष सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.