-MPC-TOP-MOST-BANNER-I

Kalewadi Crime News : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह आठ जणांवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात शनिवारी (दि. 2) एका तरुणाने गर्दी करुन त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक रजनीकांत कोळी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा 2 जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांना एकत्र बोलावले आणि शनिवारी रात्री अकरा वाजता वाढदिवस साजरा केला.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र, आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केला.

गल्लीत सुरु असलेल्या या वाढदिवसाबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.