Kalewadi News : काळेवाडीतील चित्रकला स्पर्धेत 520 विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज: कोरोनामुळे सध्या शाळा अजून बंद आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची आपल्या वर्गमित्रांची एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमांतून भेट व्हावी या विचारातून काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे ( Kalewadi Resident elfare Association) प्रजासत्ताक दिनानिमित्त ( Republic Day) 26 जानेवारीस चित्रकला स्पर्धांचे ( painting Competition) आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल 520 विद्यार्थांनी नावनोंदणी केली.

एवढ्या विद्यार्थांची व्यवस्था करण्यासाठी आठ वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच स्पर्धकांची योग्य ती काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली.

हॅपी थॉटस् बिल्डिंग, बालाजी लॉन्स, गणेश कॉलनी, क्रांतिवीर कॉलनी, वर्धमान भूमी सोसायटी, विठ्ठल मंदिर, पाटील हॉस्पिटल, स्टार बर्ड शाळा व काही सभासदांनी स्वतःच्या सोसायटीमध्ये स्पर्धेचे नियोजन करून हा उपक्रम राबवला.

या स्पर्धेचा बक्षिस वितरण पुढील आठवड्यात होणार आहे. यावेळी काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, आशा इंगळे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, सुभाष कांबळे, शारदा वाघमोडे, सुनंदा काळे, निलेश सूर्यवंशी, अमित देशमुख, किशोर अहिर व संघटनेचे इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.