Kasaba Peth Bye Election : रूपाली ठोंबरेनी केला गोपनीयतेचा भंग

एमपीसी न्यूज- कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba Peth Bye Election) आज (रविवारी) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली.  मतदानाच्या वेळी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावला.मात्र हा हक्क बजावताना त्यांनी ईव्हीएम मशीन चा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे.

 

Rahatani News : मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून मारहाण व विनयभंग

मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. रूपाली ठोंबरे पाटील ईव्हीएम मशीन चा फोटो काढून तो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक ( Kasaba Peth Bye Election) आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.