Kasarwadi news : शॉर्टसर्कीटमुळे जय गणेश टायरला भीषण आग

एमपीसी न्यूज –  कासारवाडी येथील कुंदननगर येथे जय गणेश टायरच्या सक्रॅपमधील टाय़रला शॉर्टसर्कीटमुळे  मंगळवारी (दि.31) पहाटे दोन वाजता भीषण आग (Kasarwadi news) लागली. ही आग मॅक्स न्यूरो हॉस्पिटलजवळच लागली असल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. पण अखेर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी पहाटे पाचच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, जयगणेश या टायर कंपनीच्या मोकळ्या जागेत जुने व वापरलेले टायर पडले होते, त्यांनी ही आग पकडली. त्यामुळे परिसरात धुर व आगीचे लोट उठू लागले.घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी एकूण 14 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक शाम लांडे हे रात्री दोन वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड अग्निशमनदल तसेच वायसीएम रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून मदत केली.

त्यामध्ये पीएमआरडीए मारुंजी, पिंपरी-चिंचवड अग्निशमनदलाच्या दहा गाड्या, टाटा मोटर्स, खडकी कॅन्टोनमेंट यांचा समावेश होता. तर जय गणेश कंपनीतर्फे एक जेसीबी बोलावण्यात आला होता. तसेच जवळ असणाऱ्या मंत्री अपार्टमेंटच्या रहिवाश्यांनी देखील मोठी मदत केली. त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या फायर साधनांचा वापर करून आग विझवण्यात खारीचा पण महत्त्वाचा वाटा दिला.

Today’s Horoscope 31 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

जय गणेश कंपनीच्या आवारात असलेल्या टायरने मोठी आग पकडल्याने आगीचे रौद्र रुप उपस्थितांना पहायला मिळाले. मात्र, जवळ असणाऱ्या मॅक्स न्युरो हॉस्पीटलला याची झळ बसण्याची शक्यता होती. त्यामुळे मॅक्स न्युरोचे मालक डॉक्टर उमेश फडके व त्यांच्या टीमने त्यांच्या आगीच्या बाजूचे 19 रुग्ण वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. हॉस्पिटल वाचले असले तरी जवळ असणाऱ्या (Kasarwadi news) कोटेश्वर टिंबर्स यांना मात्र या आगीची झळ पोहचली आहे.

तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी पहाटे पाचच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. नंतर 8 वाजेपर्यंत कूलिंगचे काम चालू होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.