Khadki : खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत 9 ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

Complete lockdown in Khadki cantonment area from 9th to 15th July : खडकीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 240

एमपीसी – खडकी परिसरात आज (दि.6) पंधरा नवीन कोरोना रुग्ण सापडल्यानंतर खडकीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 240 एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खडकी छावणी परिसरात नऊ जुलै पासून 15 जुलैपर्यंत संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खडकी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

या सात दिवसांच्या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा व सुविधा ठरलेल्या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दूध विक्री सेवा सकाळी 7 ते 10 या वेळेत, पेट्रोल पंप सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.

किराणा दुकाने सरकारी नियमानुसार सुरू राहतील. बॅंक ठरलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत, तर एटीएम सुविधा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना या देशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. खडकी छावणी परिसरात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार 225 रुग्णांपैकी 135 रुग्ण बरे झाले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या 79 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खडकीत 190 जण होम क्वारंटाइन आहेत तर 590 जणांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like