Khadki Crime News : बँकेत भरण्यासाठी दिलेले 12 लाख रुपये घेऊन नोकर पळाला

एमपीसीन्यूज : बँकेत भरण्यासाठी दिले बारा लाख रुपये घेऊन नोकर पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

बाबुराव भैयाराम अग्रवाल (वय 60) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून रावसाहेब शाहराम कराळे (वय 45) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, रावसाहेब कराळे हा बाबुराव अग्रवाल यांच्याकडे काम करतो. बाबुराव अगरवाल यांच्याकडील महावितरण वीज केंद्र आकुर्डी येथे दोन दिवसांमध्ये जमा झालेली 12 लाख 27 हजार 920 रुपयांची रोख रक्कम आणि काही चेक बँकेत भरण्यासाठी त्यांनी रावसाहेब कराळे याच्याकडे दिली होती.

परंतु ती रक्कम रावसाहेब काळे यांनी बँकेत न भरता फिर्यादी यांची मोटारसायकल आणि पैसे घेऊन निघून गेला आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.