Khadki : शिवाजीनगर बस स्टँड परिसरात कटरने वार करून प्रवाशांना लुबाडले; दोन प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्टॅन्डमध्ये (Khadki) असणाऱ्या प्रवाशांना कटरने वार करून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कटरने वार केल्याने दोन प्रवासी तरुण जखमी झाले आहेत. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज जाफर शेख (वय 21) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बाबुराव जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Maharashtra : कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत – शिक्षण मंत्री

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर येथील एसटी स्टँडच्या शौचालयातून फिर्यादी लघुशंका करून बाहेर पडत होते. यावेळी आरोपींनी त्यांना अडून त्यांच्या खिशातील तीनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीचा मोबाईल ही काढून घेत असताना फिर्यादीने विरोध केल्याने कट्टर सारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या गालावर वार केले.

तर, त्याच ठिकाणी आणखी एक प्रवासी संकेत साबळे याला देखील आरोपींनी पैसे दिले (Khadki) नाहीत म्हणून धारदार हत्याराने त्याच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.