Khadki : जावयाची सासूला मारहाण; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-घरात झालेल्या किरकोळ वादा नंतर (Khadki) जावयाने सासूला मारहाण करत तिच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकले. इतकेच नाही तर डोके फरशीवर आपटून सासूचे दोन दात देखील पाडले. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आर्मी कॉर्टर मध्ये हा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावई महिंद्र सिद्धनाथ तोरणे (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू सुजाता कैलास शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

2000 Rupees Ban : आज पासून बदलता येणार 2 हजाराची नोट, काय असतील नियम

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी महिंद्र हा फिर्यादी यांचा जावई आहे. फिर्यादी यांनी त्याला त्यांच्या घरातून दुसरीकडे राहण्यास जा असे सांगितले होते. याचाच राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकले. फिर्यादीच्या केसाला धरून खाली फरशीवर आपटून त्यांचे दोन दात देखील पाडले आहेत. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास (Khadki) सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.