Khandala : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील अपघातात टँकर चालक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुणे – मुंबई एक्स्प्रेसवेवरील अपघातात (Khandala) टँकर चालक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती महेश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, खंडाळा) यांनी दिली आहे.

PCMC: सेप्टिक टँकच्या ठेकेदारांनी कामाच्या स्वरुपाची नोंदणी करावी, आयुक्तांची सूचना

अपघाताची प्राथमिक माहिती देताना, महाजन म्हणाले की, आज मंगळवार 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खंडाळा हद्दीत मुंबई लेनमध्ये टँकरने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. तॊ टँकर केबिनमध्ये आत अडकला असल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढले. तॊ बेशुद्ध असल्याने त्याला खांद्यावर घेतले व ऍम्ब्युलन्समध्ये बसवून (Khandala) पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमी चालक बेशुद्ध असल्याने त्याचे नाव व पत्ता कळू शकला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.