Khed : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – वस्तीमध्ये का आलास म्हणत(Khed) तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी एकाला चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) नाणेकरवाडी येथे , खेड येथे घडली.

याप्रकरणी तुकाराम नारायण किणे (वय 27 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजेश रामप्रसाद कोल (वय 30 रा.नाणेकरवाडी) याला अटक केली आहे.

Pune : ‘अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंचा लूक रिलीज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Khed)फिर्यादी यांना घराजवळ बोलावून घेत आरोपीने तु आमच्या वस्तीमध्ये कसा काय आला म्हणत आरोपीने फिर्यादीला लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला होता.यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.