Khed : मूळ मालकाच्या परस्पर चक्क 50 गुंठे शेत जमीन विकली; चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मूळ मालकाच्या परस्पर 50 गुंठे शेतजमिनीची विक्री केल्याचा प्रकार खेड (Khed) तालुक्यातील चिंबळी येथे घडला.  या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 4 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबर या कालावधीत घडली. 

बंकटसिंग रामसिंग परदेशी (वय 64, रा. देवी निमगाव, ता. आष्टी, बीड), सुरेशसिंग बाबूसिंग परदेशी (वय 67, रा. धुळे), विठ्ठलसिंग बाबूसिंग परदेशी (वय 61, रा. धुळे), अमितसिंग अनिलसिंग परदेशी उर्फ गणेश परदेशी (रा. देवी निमगाव, ता. आष्टी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश बाळासाहेब काकडे (वय 39, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पाच टक्के आरक्षणासह संरक्षणासाठी मुस्लिम समाज आग्रही – राहुल डंबाळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंकटसिंग, सुरेशसिंग, विठ्ठलसिंग यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावावर असलेली 50 गुंठे शेत जमीन स्वप्नील काकडे नावाच्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर करारनामा करून विकली. सदर जमिनीचे कधीही न रद्द होणारे (Khed) कुलमुखत्यार पत्र तसेच साठेखत असताना आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर हा प्रकार केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.