Khed : मेदनकरवाडी येथील वर्कशॉपमध्ये 20 लाखांची चोरी

एमपीसी न्यूज –  खेड  (Khed) तालुक्यातील मेदनकरवाडी येथे एका वर्कशॉपमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी तब्बल 20 लाख 89 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.

हनुमंत उद्धव गोसावी (वय 47, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (Khed) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Purnanagar : कृती समितीच्या मागणीला यश, गणपती विसर्जनासाठी शिवतेजनगर येथे हौदाची व्यवस्था

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेदनकरवाडी येथे जी टेक ऑटोमायजेशन नावाचे वर्कशॉप आहे. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांनी वर्कशॉप कुलूप लाऊन बंद केले. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी वर्कशॉपच्या कड्या तोडून आत प्रवेश केला. वर्कशॉपमधून चोरट्यांनी सीएनसी मशीन दुरुस्त करण्यासाठी लागणारे 20 लाख 89 हजार 507 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.