Purnanagar : कृती समितीच्या मागणीला यश, गणपती विसर्जनासाठी पूर्णानगर येथे हौदाची व्यवस्था

एमपीसी न्यूज – पूर्णानगर, शिवतेजनगर, शाहूनगर  परिसरातील (Purnanagar) घरगुती, सोसायटीतील गणपती खाणीमध्ये विसर्जनास खाण मालकांनी नकार दिल्याने नागरिकांची अडचण होणार होती. त्यामुळे विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी पूर्णानगर विकास कृती समितीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून  शनी मंदिर मैदानावर मूर्ती संकलन, विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Wakad : भांडणे सोडवली म्हणून तरुणाला मारहाण ; तिघांना अटक

माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, कृती समितीचे अध्यक्ष सुनील कदम, शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश मोरे, मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत करोली, ऋषिकेश जाधव यांनी फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांना निवेदन दिले होते. पूर्णानगर, शाहूनगर  परिसरातील घरगुती व सोसायटीतील गणपतीचे विसर्जन शिवतेजनगर येथील खासगी खाणीमध्ये केले जात होते. परंतु, यंदा खाण मालकांनी विसर्जनासाठी नकार दिल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागणार होते.

त्यामुळे कृती समितीने शनी मंदिर मैदान येथे मूर्ती संकलन, विसर्जन हौद बांधून देण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्याला (Purnanagar) प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत हौद बांधून दिला. त्यामुळे पूर्णानगर येथील घरगुती व सोसायटीच्या गणपती विसर्जनाची सोय होणार आहे. परिसरातील नागरिकांनी याच ठिकाणी गणपती विसर्जनासाठी यावे असे आवाहन पूर्णानगर विकास कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.