Khed : अज्ञात वाहनचा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.18) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास खेड (Khed) तालुक्यातील खराबवाडी येथे घडला.

Khed : मेदनकरवाडी येथील वर्कशॉपमध्ये 20 लाखांची चोरी

पोलीस अंमलदार राजेश गिरी यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.