Khelo India Youth Game : मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना सांघिक विजेतेपद ज्युदोमध्ये मिथिला भोसलेचा सुवर्णपंच

एमपीसी न्यूज – खेलो इंडिया स्पर्धेत (Khelo India Youth Game)  महाराष्ट्राच्या मल्लखांब खेळाडूंनी केलेल्या चित्तथराक कसरती संघाला सुवर्णपदक देऊन गेल्या. दोन दिवसांपूर्वी मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. प्रारंभीपासून महाराष्ट्राची मदार मल्लखांबच्या संघावर होती. परंतु मुलींच्या संघाला रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्र तालिकेत एक पदकाने हरियानाच्या मागे आहे. आज दुसरे सुवर्णपदक ज्युदोमध्ये मिळाले. ४० किलो वजन गटात मिथिला भोसले हिने ही सुवर्ण कामगिरी केली. ती मूळ ठाण्याची असून सध्या बालेवाडी येथे ज्युदो अकादमीत सराव करते. तिने गुजरातच्या अर्चना नागेरा हिच्यावर विजय मिळवला.
प्रशिक्षक मधुश्री देसाई-काशीद, मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मिथलाचा सराव सुरू असतो. मंगेश भोसले हे तिचे वडील आहेत.

 

महाराष्ट्राच्या (Khelo India Youth Game)  संघाने रोप, पोल आणि हँगिंग या प्रकारात कसरती केल्या. या संघामध्ये अवधूत पिंगळे (मुंबई), ऋषभ गुगळे (मुंबई), अथर्व कोंडविलकर (मुंबई), चेतन मानकर (नाशिक), मुग्रान पाठारे (मुंबई), अमेय सूर्ववंशी (पुणे) यांचा समावेश होता. रात्री आणि उद्या (शनिवारी) मल्लखांबचे वैयक्तिक क्रीडा प्रकार होणार आहेत, अशी माहिती प्रशिक्षक अनिल नागपुरे यांनी दिली. त्या प्रकारातही महाराष्ट्राला सुवर्णपदकांची आशा आहे.

मुलींच्या संघाने (Khelo India Youth Game) सांघिक उपविजेतेपद पटकावले होते. त्या संघात आरूषी शिंगवी, तमन्ना संघवी, प्रणाली मोरे, भक्ती मोरे, हार्दिका शिंदे, पलक सुरी यांचा समावेश होता. मुलींच्या संघाच्या काजल काळे या प्रशिक्षक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.