Mumbai News : खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची लागण 

एमपीसी न्यूज – अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. आज (रविवारी) सकाळी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला‌‌. खिलाडी अक्षय कुमारने स्वतः याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. 

अभिनेता अक्षय कुमारने असे ट्वीट केले आहे की, ‘कोरोनापासून बचावात्मक सर्व खबरदारी घेऊन देखील, आज सकाळी माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून सध्या होम क्वारंटाईन आहे व सर्व वैद्यकीय सूचनांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी. काळजी घ्या.’

 

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. यापासून राजकीय नेते मंडळी, कलाकार ते मैदानावरील खेळाडू देखील संक्रमित होत आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.