India Corona Update : चोवीस तासांत 93,249 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशात नव्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ झाली असून, तब्बल 93 हजार 249 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली असून ती सात लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 24 लाख 85 हजार 509 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 60 हजार 048 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 93.14 टक्के एवढा झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची सात लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली असून, देशात सध्या 6 लाख 91 हजार 597 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 513 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 64 हजार 623 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.31 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 24 कोटी 81 लाख 25 हजार 908 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 66 हजार 716 चाचण्या शनिवारी (दि.03) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 7 कोटी 59 लाख 79 हजार 651 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.