Khopoli : द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर व इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीमध्ये किमी 39 जवळ झाला.

_MPC_DIR_MPU_II

मारुती बलभीम कोराडकर ( वय 60, रा. बार्शी सोलापुर) हे अपघातात मृत्युमुखी पडले असून संतोष अंकुश सावंत (वय 35, बत्तीस शिराळा, सांगली) हे जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली आर्यन टूर्स अँन्ड ट्रँव्हलर्स कंपनीची इनोव्हा गाडी क्र. (एमएच 03 सीपी 4747) हीसमोरून जाणारा कंटेनर क्र. (एमएच 43 बीजी 0381) याला मागून जोरात धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.