Khopoli : खोपोली एक्झिटजवळ पुलर व कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ यु टर्न घेताना एक महाकाय पुलर व कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती तर पुण्याकडे येणारी एक लेन बंद पडली होती. सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने जाणार्‍या पुलर ह्या मोठ्या कंटेनरने छेद रस्त्यावरुन मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर यु टर्न घेतला मात्र आकाराने मोठा असलेल्या या पुलरला टर्न न बसल्याने पुलर व कंटेनर हे रस्त्यात अडकले. त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या तिनही लेन आणि पुण्याकडे जाणारी एक लेन बंद झाली होती. या घटनेची माहिती समजताच आयआरबीच्या पथकाने व महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने सदर पुलर खेचून बाजूला केला. यामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली होती. द्रुतगती महामार्ग अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.