Kivale : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शिवसंकल्प अभियान ( Kivale)  मेळावा मुकाई चौक, किवळे येथे शनिवारी (दि. 6) होणार आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड, किवळे आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत. हा बदल शनिवारी सकाळी नऊ ते रात्री बारा पर्यंत असेल. यातून पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभाग, पेट्रोल, डिझेल टॅंकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस आदी वाहने वगळण्यात आली आहे.

मुळाई चौक ते आदर्शनगर हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून).
पर्यायी मार्ग – पुणे बाजूकडून आदर्शनगर येथे जाणाऱ्या वाहनांनी देहूरोड बाजार येथून विकासनगर मार्गे जावे.

शिंदे पेट्रोलपंपाकडून मुकाई चौकाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
पर्यायी मार्ग – मुंबई कडून येणारी वाहने एच पी पेट्रोलपंप येथून डाव्या बाजूस सर्व्हिस रोडने
समिर लॉन्स अंडरपास येथून डाव्या बाजूने वळून रावेत गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

Pune : पैसे चोरल्याच्या संशयावरून एकाने मित्राचाच केला खून

मुंबई एक्सप्रेस वे वरुन किवळे चौकात रावेत एक्झीट मधून येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
पर्यायी मार्ग मुंबई कडून येणारी वाहने एच पी पेट्रोलपंप येथुन डाव्या बाजूस सर्विस रोडने समिर लॉन्स अंडरपास येथून डाव्या बाजूने वळून रावेत गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

पुणे कडून मुंबईकडे जाणारी वाहने समिर लॉन्स साईडने कृष्णा हॉटेल चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना बंदी राहील (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
पर्यायी मार्ग- एक्सप्रेस हायवे ने मुंबईकडे जाता येईल.

किवळे बस स्टॅंड ते विठ्ठल हॉटेल पंक्चरकडे जाणारा साईड रोड सर्व वाहनांसाठी बंद राहील (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
पर्यायी मार्ग – मुंबईकडून येणारी वाहने एच पी पेट्रोलपंप येथून डाव्या बाजूस सर्विस रोडने समिर लॉन्स अंडरपास येथून डाव्या बाजूने वळून रावेत गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

मावळा पुतळा ते विठ्ठल हॉटेल पंक्चर व कृष्णा चौक हॉटेल सेंटोसा पंक्चर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
किवळे गावाकडून येणारी सर्व प्रकारची वाहने कृष्णा हॉटेल चौकाकडे न येता समिर लॉन्स अंडरपास मार्ग इच्छित ( Kivale) स्थळी जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.