Pune : पैसे चोरल्याच्या संशयावरून एकाने मित्राचाच केला खून

एमपीसी न्यूज –  सिंहगड रोड भागात पैसे चोरल्याच्या संशयावरून एकाने ( Pune) मित्रालाच त्याच्या गुप्तांगावर तसेच छातीवर बेदम मारहाणकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Maharashtra : सामूहिक वन हक्काच्या जमिनीवर होणार बांबू लागवड

संदिप राजाराम पाटील (वय 42 , रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रसाद गोपाळ कारेकर याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप व प्रसाद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघांना दारूचे व्यसन आहे. संदिप हा कचरा वेचत असत. तसेच, प्रसादच्या घरासमोर राहत होता. त्याचे कुटूंबिय तुकाईनगर येथे राहत होता. यादरम्यान, तो मिळेल तसे कामेही करत होता.
प्रसाद याच्या घरातून पैशांची चोरी झाल्याची घटना घडली होती. संदिपने पैसे चोरल्याचा संशय प्रसादला आला. त्याने संदिप याला बेदम मारहाण केली.

त्याच्या गुप्तांगावर तसेच छातीवर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर कोसळला. त्यानंतर प्रसाद हा तेथून निघून गेला. काही वेळ झाल्यानंतर तो उठत नसल्याने प्रसादने पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला माहिती दिली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संदिपला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. बेदम मारहाण केल्याचे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रसाद याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस ( Pune)  करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.