Kondhwa : कोंढव्यात रेडबुल एनर्जीच्या गोडाऊनमध्ये जबरी चोरी

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेडबुल एनर्जी ड्रिंक ठेवलेल्या (Kondhwa) एका गोडाऊनमध्ये 27 ऑगस्ट च्या रात्री जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रामचंद्र मदनलाल अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की , पिसोळी येथे फिर्यादी यांचे मंगल ट्रेडिंग कोल्ड्रिंक्स नावाने होलसेल गोडाऊन आहे. 27 ऑगस्ट च्या रात्री ते गोडाऊन बंद करून घरी गेले असताना अज्ञात आरोपींनी गोडाऊनच्या पत्र्याचा भिंतीचे नट बोल्ट खोलून तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे रेड बुल एनर्जी ड्रिंक चे 62 बॉक्स चोरून नेले आहेत. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून (Kondhwa) अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.