Koregaon Park : ग्राहकाचे दुकान मालक महिलेसमोरच हस्तमैथुन; कोरेगाव पार्क परिसरातील घृणास्पद प्रकार

एमपीसी न्यूज : कपडे घेण्यासाठी दुकानात आलेल्या (Koregaon Park) एका ग्राहकाने दुकान मालक असलेल्या महिलेसमोरच हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मेन्स अँड वूमेन्स कपड्याच्या दुकानात 14 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे कोरेगाव पार्क परिसरात मेन्स अँड वुमेन्स कपड्याचे दुकान आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या दुकानात एकट्या असतानाच कपडे खरेदी करण्याच्या बहान्याने अनोळखी व्यक्ती दुकानात आली. फिर्यादी दुकानात एकट्या असल्याचे पाहून त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर विचारून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे तळेगाव भूषण व कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान

त्यानंतर ट्रायल रूममध्ये कपडे ट्राय करण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे पाहून एका हाताने इशारा केला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्यासमोर हस्तमैथुन केले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणीचा रुद्रावतार पाहून आरोपी दुकानातून पळून गेला. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल (Koregaon Park) करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.