_MPC_DIR_MPU_III

Kothrud News : पतित पावन संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करणार : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हापासून पतित पावन संघटनेच्या कार्याशी परिचित आहे. कोथरूड हा पतित पावनचा बालेकिल्ला असून संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करेन, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

शास्त्रीनगर येथील पतित पावनचे उपाध्यक्ष जालिंदर तथा पप्पू टेमगिरे यांच्या घरी आमदार पाटील यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. तेव्हा मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

त्यांच्या समवेत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर, मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, विभाग प्रमुख राजू मोहोळ, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सुनिल मराठे , खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष निलेश घारे, सहसंघटक शरद देशमुख, अण्णा बांगर यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

_MPC_DIR_MPU_II

जागोजागी चंद्रकांत पाटील यांना ओवाळून, पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांच्या एक तासाच्या भेटीत त्यांनी पतित पावन संघटनेच्या सध्याच्या कार्याची माहिती घेतली, तसेच त्या भागातील नागरी समस्या ही समजून घेतल्या. महिला बचत गटाच्या कार्याला त्वरित मदत जाहीर करतानाच कोणत्याही कामासाठी मी सदैव उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांशी विस्तृतपणे संवाद साधताना त्यांनी सर्व अडचणी जाणून घेतल्या. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळमकर यांनी संघटनेच्या कार्याची व कार्यकारिणीची माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.