Surotsav : “सुरोत्सव” ने रसिक झाले मंत्रमुग्ध, राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने

एमपीसी न्यूज – कोथरूड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम मोठ्या उत्याहात पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. (Surotsav) यावेळी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले.(Surotsav) कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् यांनी पाहिले.या कार्यक्रमात राहुल देशपांडे, अमृता नातू यांच्या शास्त्रीय गायन, सदाबाहर गाीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिकली. काल रात्री जोरदार पाऊस झाला असतांना देखील आज पहाटे पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. 1600 पेक्षा अधिक रसिक कार्यक्रमास उपस्थित होत तर ऑनलाईन सुमारे 2000 नागरीक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले होते.

pimpri news: शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेल वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत – राष्ट्रवादीची मागणी
‘तसेच 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 05:30 वाजता सुरांच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे या सदाबाहर गाणे सादर करणार असून सूत्रसंचालन समीरा जोशी करणार आहेत.(Surotsav) यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.