Kothrud : आगीमधे अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज : आज पहाटे कोथरुडमधील (Kothrud) प्रभा को. ऑप सोसायटीमधे आग लागल्याची घटना घडली. या घटनेची वर्दी मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन दल नियंत्रण कक्ष आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आले.

प्रभा को. ऑप सोसायटीत तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने खिडकीमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. त्याचवेळी त्या आग लागलेल्या सदनिकेमधे दोनजण अडकले असल्याची माहिती मिळाली असता जवानांनी होज पाईप घेऊन वर जाऊन एकीकडे पाण्याचा मारा सुरू केला तर घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर व जवान नितिन घुले यांनी तातडीने ब्रिदिंग अॅपरटस सेट (श्वशन उपकरण) परिधान करुन एका खोलीत धुरामधे अडकलेल्या एक विद्यार्थी व एका विद्यार्थीनीला सुखरुप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणले. व त्यांचा जीव वाचवला. जवानांनी जेट स्प्रे वापर करुन पाणी मारत सुमारे दहा मिनिटात पूर्ण आग विझवली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

Rakshak Chowk : रक्षक चौकात फडकणार 100 फुटी उंच तिरंगा

विद्यार्थी पहाटेपर्यंत अभ्यास करीत होते, असे त्यांनी सांगितले. पुढच्या (Kothrud) खोलीमधील लाकडी सामान, सोफा, कपाट, खिडक्या इत्यादी साहित्य जळाले. एका विद्यार्थ्याला किरकोळ स्वरुपात हाताला आगीची झळ लागली. या कामगिरीत कोथरुड अग्निशमन केंद्र अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक रमेश गायकवाड व जवान नितिन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी अग्निशमन दल वेळेत आल्याने आम्ही सुखरुप बाहेर आलो याबद्दल दलाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.