Alandi : श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित (Alandi) श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मेहंदी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व सावित्रीबाईंची वेशभूषा केलेले विद्यार्थीनींनी प्रतिमा पूजन केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. विविध गीतांमधून त्यांचे जीवन कार्य उलगडले. इयत्ता चौथी शिवनेरीच्या विद्यार्थ्यांनी मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी सावित्रीबाई यांनी त्यावेळच्या समाजाला कसे जागृत व प्रवृत्त केले हे नाटकातून सादर केले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मेहेंदी स्पर्धेचे आयोजन केले.

Pimpri : लोकशाही वाचवण्यासाठी शनिवारी पिंपरी मध्ये ‘निर्भय बनो’ जाहीर सभा

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगांवकर यांनी आज सावित्रीबाईच्या लेकी (Alandi) सर्व क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे याचे सर्व श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली कंखरे व विश्वभर भालेराव या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.