Pune : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया सोमवारपासून

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत 100 कनिष्ठ अभियंत्यांची भरती (Pune) करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपर्यंत त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

Alandi : श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची तीन वर्षांच्या अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून काढण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या 135 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीदेखील जाहीर करण्यात आली होती. या यादीची मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील न्यायप्रविष्ट प्रकरणातील जागा वगळता अन्य जागांसाठी नव्याने भरती केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.