Pune News : कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे भारतीय मजदूर संघाच्यावतीने पुण्यात स्वागत

एमपीसी न्यूज – कोरोना परिस्थितीनंतर काही ऊद्योग व कामगार क्षेत्रातील परिस्थिती आव्हानात्मक निर्माण झाली आहे. काम व वेतनातील अस्थिरतेमुळे कामगार क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.या परिस्थितीत राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पुण्यात भेट घेऊन कामगार मंत्री यांचे स्वागत व अभिनंदन ऑगस्ट 20 ला केले. 

तसेच कामगारांच्या प्रश्नांबाबत संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबरोबर बैठकीची मागणी केली आहे.

*असंघीटत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना तयार करून लागू करावी.

* कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात कामाच्या अनुभवानुसार वाढ करावी व झालेल्या कामाची ग्रजुईटी द्यावी

* महाराष्ट्र शासनाने किमान वेतन कायद्यानुसार 17 / 18 शेल्डुल ऊद्योगातील कामगारांचे कायद्यानुसार 5 वर्षापूर्वी पुर्ननिर्धारण करणे कायदेशीर बंधनकारक होते. पण या उद्योगातील किमान वेतनची मुदत संपुनही 7/8 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे.शासनाने अंमलबजावणी केली नसल्यामुळे कामगारांना कमी वेतन मिळत आहे.तरी किमान वेतन कायद्यानुसार नुसार पुनःनिर्धारण करून फरका सहित रक्कम कामगारांना मिळावी

* शासनाने कामगारांना ईएसआय व पीएफ योजना लागू करून कामगारांची अंशदान रक्कम शासनाने भरावे.

* भारतीय मजदूर संघाने लेबर कोड नियम, या बाबतीत घेतलेल्या हरकती व सूचनांचा बाबतीत भारतीय मजदूर संघाच्या समावेत त्रिपक्षीय चर्चा आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा

या वेळी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात भारतीय संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, असंघीटत प्रभारी उमेश विस्वाद, पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, मुंबई अध्यक्ष बापू दडस, शासकीय कर्मचारी संघटनेचे राधेश्याम कुलकर्णी, विवेक ठकार, श्रीपाद कुटासकर, हिंदुस्थान अॅन्टोबायटीस्स कंपनीतील संघटनेचे सेक्रेटरी विजय पाटील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.