Alandi News : भीवरेवाडी अंगणवाडीमधून एलईडी टीव्ही, वजनकाटा चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण जवळ मेदनकरवाडी येथील शाळेच्या स्टाफरूम मधून चोरट्यांनी संगणक आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आणखी असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोयाळी तर्फे चाकण येथील भीवरेवाडी अंगणवाडी मधून चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे.

योजना शांताराम भीवरे (वय 39, रा. भीवरेवाडी कोयाळी, ता. खेड) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीवरे या भीवरेवाडी अंगणवाडीमध्ये काम करतात. रविवारी दुपारी साडेबारा ते सोमवारी सकाळी दहा या कालावधीत त्यांची अंगणवाडी कुलूप लाऊन बंद होती. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. अंगणवाडी मधून 33 हजार 600 रुपये किमतीचे एलईडी टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा चोरट्यांनी चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, मेदनकरवाडी येथील कन्या विद्यालय या शाळेतून अज्ञात चोरट्यांनी दोन संगणक आणि इतर साहित्य साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली होती. त्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.