Pimpri News : केंद्राचा रेशन विक्रेत्यांना बेरोजगार करण्याचा कुटील डाव हाणून पाडू; देशभरातील दुकानदारांचा संकल्प

एमपीसी न्यूज : ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचा तेरावा स्थापना दिवस दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठान येथील सभागृहात उत्साहात साजरा झाला. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.सी. कटारिया आणि राष्ट्रीय मुख्य महासचिव देवन रजक यांनी संयुक्तपणे तेराव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष के. पी. चौहान यांनी संचालन केले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डीसी कटारिया, प्रधान महासचिव देवन रजक, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय गुप्ता, राष्ट्रीय मीडिया प्रभारी मनोज कुमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष मांगेराम जाटव, श्याम सिंह सोहेल, शिवलाल जैन, महाराष्ट्रासे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरज बाबर, राष्ट्रीय खजिनदार विजय गुप्ता, चिंतामणी सोंडकर, विशाल लोखंडे, शरद पवार, अभिजित सडडो, राष्ट्रीय सं.सचिव नितीन पेंटर, राष्ट्रीय संगठन सचिव हीरालाल प्रसाद यादव, मनमोहन प्रसाद, सहदेव कुमार सहज, देवेंद्र सिंह गोपाल यादव, कामेश्वर प्रसाद सिंह, मनोज कुमार, महेश कुमार, दिनेश, जिगणेश परमार (गुजरात), नागेंद्र कुमार (हरियाणा), आलोक दास, तरुण मुख़र्जी, शरीफुल इस्लाम (प. बंगाल), कौशल पाल विजय विक्रम (उ प्रदेश), नबूल हुसैन, जागेश्वर उमा चरण दास (झारखंड), हाजी हिसाबुद्दीन, धर्मवीर ,(दिल्ली) राम किशोर शर्मा, मोहित कुमार राजपूत, महेश, कमलेश देवी, कुलदीप, प्रवेन्द्र, अविका शर्मा (दिल्ली) आणि फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News : इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी करणाऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

राष्ट्रीय मुख्य महासचिव देवन रजक यांनी तेरा वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, श्रीकांत लाभ यांनी ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतातील वितरण व्यवस्थेतील विक्रेत्यांना एका धाग्यात बांधण्याचे काम केले. राज्यस्तर ते देशपातळीपर्यंत व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी ते लढले. देशभरातील प्रतिनिधींना, डीलर्सना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी मात केली. त्यांचा तोच संकल्प आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, रेशन विक्रेत्यांचे कमिशन संपूर्ण भारतात एकसमान असावे. वन नेशन वन रेशन अंतर्गत वन कमिशनचा मुद्दा, ई-पॉस मशिनमध्ये येणार्‍या सर्व्हरची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देय असलेले मार्जिन केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यानंतरही राज्य सरकारांकडून विक्रेत्यांना अदा करण्यात येत नाही, जे विनाविलंब मिळाले पाहिजे. इ-पॉस मशिनमध्ये वजनकाटा जोडण्यापूर्वी सर्वप्रथम अन्न महामंडळाच्या गोदामातच वजन करण्याचे काम सुरू करावे. PDS अंतर्गत कोणतीही नवीन योजना आखताना त्यात फेडरेशनच्या शिष्टमंडळाचाही सहभाग असावा.

संपूर्ण भारतात एकसमान कव्हरेज असावे, अशा अनेक मागण्या सरकारकडे संघटनेने केलेल्या आहेत. दरम्यान सरकारकडून सध्या बचत गट, समित्या आदींना रेशन दुकानांचा परवाना देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे रेशन विक्रेते बेरोजगार होतील, असे झाल्यास फेडरेशनला देशात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, प्रसंगी न्यायालययात जाण्याचीही तयारी ठेवावी लागेल. त्याच्या जनजागृतीकरिता फेडरेशनचे भारतभर विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.