Vadgaon Maval News : लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या वतीने नगरपंचायतीच्या कर्मचारी बांधवांना प्रोटीन पावडर डब्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या वतीने वडगांव नगरपंचायतीचे सर्व विभागातील कर्मचारी बांधवांना प्रोटीन पावडर डब्यांचे वाटप करण्यात आले. शरीरात आवश्यक असणारे प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह आदी घटकांचा यांमध्ये समावेश केलेला आहे.

लायन्स क्लब ऑफ वडगांवचे अध्यक्ष ला. दिलीप मुथा यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक चंपालाल मुथा, संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.दामोदर भंडारी, सचिव झुंबरलाल कर्णावट, गुलाब म्हाळसकर, बाळासाहेब बोरावके, अमोल मुथा,अ‍ॅड चंद्रकांत रावल,नंदकिशोर गाडे, प्रदीप बाफना, संजय गांधी,संजय भंडारी, आदिनाथ ढमाले,योगेश भंडारी,स्वाती मुथा, रेखा भंडारी, सुनंदा म्हाळसकर, सीमा बाफना , नूतन मुथा , शोभा भंडारी, छाया रावल, माधवी बोरावके, शितल मुथा, रूपाली ढमाले आदी उपस्थित होते.

भूषण मुथा यांनी या उपक्रमाची माहिती देत आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.