Loksabha election 2024 : मावळचा खासदार ठरविणार पिंपरी-चिंचवडकर!

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाची एकूण 25 लाख 9 हजार 461 मतदार संख्या आहे. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील 13 लाख 29 हजार 748 तर पनवेल, कर्जत, उरणमधील 11 लाख 79 हजार 713 मतदार संख्या आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख 50 हजार जास्त मतदार आहेत. त्यामुळे मावळचा खासदार (Loksabha election 2024) पिंपरी-चिंचवडकर ठरविणार आहेत. दरम्यान, उर्से टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक कोटी रुपये किमतीचे तीन किलो सोने जप्त केले.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ तर घाटाखालील रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 25 लाख 9 हजार 461 मतदार आहेत. त्यापैकी चिंचवडमध्ये सर्वाधिक म्हणजे 5 लाख 95 हजार 408, पनवेलमध्ये 5 लाख 65 हजार 915, मावळात 3 लाख 69 हजार 534, पिंपरीत 3 लाख 64 हजार 806, उरणमध्ये 3 लाख 9 हजार 275 तर कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 3 लाख 4 हजार 523 मतदार (Loksabha election 2024) आहेत.

LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

मावळ लोकसभा मतदारसंघात 25 लाख 9 हजार 461 एकूण मतदार आहेत. यामध्ये 13 लाख 10 हजार 434 पुरूष तर 11 लाख 98 हजार 868  महिला मतदार  आहेत. महिलांच्या तुलनेने 1 लाख 11 हजार 572 पुरूष मतदार जास्त आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकेबंदी सुरू असून उर्से टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक कोटी रुपये किमतीचे तीन किलो सोने जप्त केले. यापूर्वीही तिथे 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात होणार्‍या आर्थिक उलाढालीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.