Lonavala : ओमकार तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजन केले होते. सोबतच यावेळी शिबिरात भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत रक्तगट आणि मधुमेह तपासणी देखील करण्यात आली.

संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात ओमकार मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच तुंगार्ली गावातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत रक्तदान केले.

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील आणि लायन्सच्या झोन चेअरमन डॉ. सीमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला ओमकार तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धनकवडे, लायन्स क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष किशोर पवार, यांच्याशिवाय डॉ. हिरालाल खंडेलवाल, ऍड.प्रथमेश रजपूत, सतीश गावडे, रमेश साळवे, किरण येवले, ज्ञानेश्वर येवले, प्रकाश लोखंडे, ओमकार खिल्लारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. ओमकार तरुण मंडळ आणि लायन्सच्या वतीनं सर्व रक्तदात्यांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like