Lonavala : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले एकविरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा व मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, समन्वयक व उपनेते रविंद्र मिर्लेकर, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सुलभा उभाळे, संपर्कप्रमुख बाळा कदम, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, माजी उपसभापती शरद हुलावळे, राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सुरेश गायकवाड, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, बाळासाहेब फाटक, गबळू ठोंबरे, अंकूश देशमुख, दीपाली भिल्लारे, मनिषा भांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी देवीच्या दर्शनाकरिता आले असल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.