Lonavala : विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विनापरवाना दुचाकीवरून दारू वाहतूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी एका युवकावर शनिवारी सायंकाळी कारवाई केली. त्याच्याकडून 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पवन कराड यांनी फिर्याद दिली आहे.

राहूल जयपाल कांबळे (वय 33, रा. दत्त मंदिराच्या मागे, ओळकाईवाडी लोणावळा) या युवकावर कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळे हे त्यांची दुचाकी गाडी क्र. (एमएच 14 एफयू 3511) वरून मँक्डाँल नंबर वन व्हिस्की नावाच्या दारूच्या 180 मिली मापाच्या एकून 48 सिलबंद काचेच्या बाटल्या बेकायदा घेऊन जात असताना भांगरवाडी येथील इंद्रायणी पुलावर मिळून आले.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सामील प्रकाश, पो नाईक वैभव सुरवसे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, मनोज मोरे, अजीज मेस्त्री यांच्या पथकाने ही कारवाई करत दारूचा बाॅक्स व दुचाकी वाहन असा मुद्देमाल ताब्यात घेत कांबळे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस नाईक वैभव सुरवसे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1