Lonavala News : ‘त्या’ लग्नातील वऱ्हाडी मंडळींकडील ई-पासची चौकशी करावी – श्रीजीत रमेशन

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ अंत्यसंस्कार, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही कारणास्तव महामार्गावर प्रवासाची शासनाकडून परवानगी नसताना उल्हासनगर येथून लोणावळ्यात मोठ्या संख्येने वऱ्हाड पोहोचले कसे ?, त्यांच्याकडे ई पास उपलब्ध होते की नाही, अशा सर्व बाबींची पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

लोणावळा येथील ग्रँड विसावा या आलिशान हॉटेलमध्ये शाही थाटात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला केराची टोपली दाखवत लग्न सोहळा थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कावत यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटलेमध्ये जाऊन शहनिशा करीत कारवाई केली.  लोणावळा पोलीस आणि लोणावळा नगरपरिषद यांनी एकूण 1 लाख 14  हजारांचा दंड हॉटेलचालकावर आकारला आहे.

हॉटेल चालक हेमंत मखिजा (रा. उल्हासनगर, ठाणे) यांच्यावर शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 तसेच कलम 269 नुसार, तर हॉटेलमधील 37  खोल्या बुक करून लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या 76  वऱ्हाडी मंडळीने सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून कोविड काळ संपेपर्यंत संबंधित हॉटेल सिल करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हॉटेल चालकावर दंडात्मक कारवाई केली.

मात्र, उल्हासनगर येथून लोणावळा येथील ग्रँड विसावा या हॉटलेपर्यंत 76 वऱ्हाडी मंडळी पोहोचली कशी. महामार्गावर त्यांच्या वाहनांची तपासणी झाली कि नाही. त्यांच्याकडे इ पास होते का, याचीही सखोल चौकशी करून या प्रकरणात जे जे दोषी आढळतील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.