Hinjawadi Crime News : विप्रो कंपनीतून सहा लाखांचे कॉम्प्युटर व लॅपटॉप चोरले

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज 2 येथील विप्रो कंपनीत सहा लाख १९ हजार रुपयांचे कॉम्प्युटर व लॅपटॉप चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 19 एप्रिल रोजी कंपनीच्या एस 1 ते एस 5 बिल्डिंगमधील ऑफिसमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.30) फिर्याद नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीचे ॲक्सेस लॉक तोडून कंपनीच्या एस 1 ते एस 5 बिल्डिंग मधील ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यांनी ऑफिसमधील 6 लाख 19 हजार 400 रुपयांचे कॉम्प्युटर व लॅपटॉप चोरुन नेले आहेत.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.