Lonavala News : 75 गडांवर एकसाथ गायले राष्ट्रगीत, ‘आयएनएस शिवाजी’ यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा केला जात आहे. दक्षिण कंमाड नौसेनेच्या वतीने लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ यांच्या वतीने ‘अमृत गौरव’ उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत शनिवारी गांधी जयंती दिवशी तब्बल 75 गडांवर जात एकसाथ राष्ट्रगीत गायले गेले.

अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. चार ते पाच नागरिकांची टीम तयार करून वेगवेगळ्या 75 गडांवर त्या पाठविण्यात आल्या. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याठिकाणी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. 75 टीम दोन भागात विभागल्या होत्या. राष्ट्रगीत गायन याशिवाय गडावर स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.

देशाची विविधतेतील एकता दर्शवित स्वातंत्र्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. याशिवाय उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.