Lonavala : राज्यस्तरीय अंध पुरुष क्रिकेट स्पर्धेत पुणे वाॅरियर्स विजयी

एमपीसी न्यूज- क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) आणि सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया यांच्या वतीने लोणावळ्यातील रेल्वे ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या अंध पुरुषांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स वर मात करत पुणे वाॅरियर्सने विजयश्री प्राप्त केली.

या खेळाच्या इतिहासात पहिल्यांदाच चाळीस वर्षावरील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन मास्टर क्रिकेट असोसिएशनचे आणि संजय मोरे क्रीडा फाउंडेशनचे संस्थापक संजय मोरे व क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राचे (सीएबीएम) सचिव रमाकांत साटम यांच्या हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

ही स्पर्धा पुणे वॉरियर्स, उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबई या तीन संघांमध्ये खेळवण्यात आली. पहिला सामना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्या दरम्यान खेळवण्यात आला. यात मुंबईने सामना जिंकताना उर्वरित महाराष्ट्रने केलेल्या ८८ धावांचे आव्हान पार केले. दुसरा सामना पुणे वॉरियर्स आणि उर्वरित महाराष्ट्राच्या दरम्यान होता त्यात पुणे संघाने एक धावाने विजय मिळविला.

अंतिम सामना मुंबई आणि पुणे संघात झाला त्यात पुण्याने केलेल्या 111 धावांचे लक्ष्य मुंबई संघाला गाठता आले नाही. त्यामुळे हा चषक पुणे संघाने पटकावला. पहिल्या सामन्याचा सामनावीर किताब हरीश खरात यांना देण्यात आला त्यांनी या सामन्यात 44 धावा केल्या. तर पुढील दोन सामन्यात रवी वाघ यांनी 44 तर पुढल्या सामन्यात 31 धावा करून दोन्ही सामन्याचे सामनावीर होण्याचा मान प्राप्त केला.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपाचे माजी अध्यक्ष राजेंद्र चौहान, नगरसेवक निखिल कविश्वर व संजय मोरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.