Lonavala : सीएम चषक कबड्डी स्पर्धेत वलवणचा हनुम‍ान संघ विजयी

0 128

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघ मर्यादित सीएम चषक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेत वलवण गावातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघाने विजय संपादित केला. या संघाची जिल्हास्तरीय सीएम चषक कबड्डी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.

HB_POST_INPOST_R_A

या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील 25 मुलांचे व 5 मुलींचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, देवीदास कडु , नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, रचनाताई सिनकर, मावळ भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, युवा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, अर्जुन पाठारे, संभाजी येवले हे उपस्थित होते. सीएम चषक कबड्डी स्पर्धेच संयोजन भाजयुमोचे मावळ कार्याध्यक्ष अरुण लाड यांनी केले होते.

कबड्डी स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक – हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ , वलवण लोणावळा
द्वितीय क्रमांक – हनुमान स्पोर्टस् क्लब लोणावळा
तृतीय क्रमांक – जय मल्हार कबड्डी संघ, उंबरवाडी
चतुर्थ क्रमांक – मयुरदादा स्पोर्टस् फाउंडेशन वडगाव

HB_POST_END_FTR-A3
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: