Lonavala : किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज – तू इकडे कामाला का आलास, असे म्हणत चार जणांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 17) दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील तुंग येथे घडली.

कृष्णकांत बुधेश्वर मिली (वय 28, रा. तुंग, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकांत तुंग येथील एस्सास ऍग्रोटेक लिमिटेड या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. सोमवारी सकाळी ते कंपनीच्या प्रपोगेशन गेटवर कार्यरत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात चार जणांनी येऊन कृष्णकांत यांना ‘तू नोकरी करायला इकडे कशाला आलाय ?’ असे म्हणून दमदाटी केली. तसेच चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.