Lonavala : भुशी धरणावर तृतीयपंथीयांचा धिंगाणा; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील भुशी धरणावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत पर्यटक, स्थानिक व्यावसायिक यांना त्रास देत पोलीस कर्मचार्‍यांना आणि पर्यटकांना मारहाण तसेच शिविगाळ करणार्‍या दोन तृतीयपंथीयांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश झेंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विनी शिरसाठ आणि आम्रपाली शिंदे (दोघे राहणार गुरुकृपानगर काॅलनी, आकुर्डी, चिंचवडेनगर, चिंचवड पुणे) यांच्या विरोधातगुन्हा दाखल केला आहे.

  • लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी भुशी धरणावर पर्यटक कुठुबियांच्या समवेत वर्षाविहाराचा आनंद घेत असताना दुपारच्या सुमारास धरणावर मद्यधुंद अवस्थेत दोन तृतीयपंथी आले. त्यांनी धरणाच्या पायर्‍यांवर जात पर्यटकांना शिविगाळ करत पायर्‍यांवरुन हाकलून दिले.

यावेळी धरण परिसरात गस्तीसाठी गेलेले पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश झेंडे, विजय मुंडे व होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी त्यांना पर्यटकांना त्रास देऊ नका असे समजावले असता त्यांनी टाळ्या वाजवत पोलीसांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच अंगावरची कपडे काढत नग्न होऊन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यांना कपडे घाला, असे समजावले असता त्यांनी ‘तुम्ही आम्हाला सांगणारे कोण?, आम्हाला अधिकार आहे’ असे म्हणत पोलीसांसह पर्यटकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

  • एकाने दुकानातून टिकाव तर दुसर्‍याने चाकू घेत पर्यटकांवर हल्ला चढविला. काही जणांचे मोबाईल फोडले तर काही वाहनांवर दगडफेक केली. तृतीयपंथी मद्याच्या नशेत धुंद असल्याने कोणाचे ऐकूण घेण्यास तयार नव्हते, यामुळे पर्यटक आणि व्यावसायकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तृतीयपंथीयांकडून वारंवार भुशी धरणावर धिंगाणा घातला जात असल्याने स्थानिक व्यावसायिक हैराण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.