Lonavla : लोणावळा महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

पीएमसी न्यूज – लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित डॉ.बी.एन. पुरंदरे कला, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला.

सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन. पवार, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू व मावळ तालुका कबड्डी असोशियनचे खजिनदार विलास जाधव, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विशाल विकारी, महाविद्यायाचे सी. डी. सी. सदस्य विशाल पाडाळे यांचे उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विलास जाधव व प्राचार्य डॉ.बी.एन. पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होऊन प्रगती करण्याचे आवाहन केले. तीन दिवसांच्या क्रीडा महोत्सवमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या मुला-मुलींसाठी कबड्डी, व्होलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट, गोळाफेक यासह इतर अनेक स्पर्धांचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.

विजेत्या संघाबरोबर शिक्षकांच्या संघाने खेळाचे प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ. संजय लांडगे प्रा. राहुल सलवदे, प्रा. डॉ. लतिका बळी आदीसह शिक्षक वृंद व विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या दरम्यान आयएनएसचे फिजिकल ट्रेनर चंद्रकांत ठाकरे, एनआयएस बॉक्सिंग कोच प्रवीणकुमार व सेवावर्धिनी संस्थेचे पुरंदरे आदींनी क्रीडामहोत्सवाला भेट दिली. क्रिडा महोत्सवात प्रफुल्ल पाळेकर, कार्तिक जगदाळे, अनिकेत गायकवाड, हर्ष गायकवाड, संकेत जाधव, तेजस भांगरे, स्वप्नील विकारी यांनी पंच म्हणून काम पहिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पावन शिंगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय साळुंके, रोहन वर्तक, प्रा. प्रियांका गायकवाड, श्री. विजेश कट्टकलम यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.