Wakad News : ट्रक बंद पडल्याने भूमकर चौकात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

एमपीसी न्यूज – भूमकर चौक ते डांगे चौक दरम्यान ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. मंगळवारी (दि. 16) रात्री सातच्या सुमारास हा प्रकार घडला.

डांगे चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाकड, हिंजवडी भागाला पिंपरी – चिंचवड शहराशी जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय मोशी, च-होली भागातील शेतकरी त्यांचा ऊस कासारसाई येथील कारखान्यात नेतात, त्यासाठी देखील डांगे चौकातूनच मार्ग आहे.

 

मंगळवारी रात्री सातच्या सुमारास डांगे चौक ते भूमकर चौक दरम्यान एक ट्रक रस्त्यात बंद पडला. अनेक भागातील वाहतूक याच मार्गाने होत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. भूमकर चौकातून हिंजवडीच्या दिशेने वाय जंक्शन पर्यंत एकेरी वाहतूक असून वाय जंक्शन येथून यु टर्न घेऊन यावा लागत असल्याने देखील भूमकर चौकात सतत वाहतूक कोंडी होत असते, परंतु रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुक कोेंडीला वारंवार सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर म्हणाले, एक ट्रक बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती.  मात्र पोलिसांनी त्वरित वाहतूक सुरळीत केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.