Pimpri News: कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणी येतेय? ‘या’ नंबरवर संपर्क साधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाणीपुरवठ्यासंदर्भात विविध तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविणेसाठी महापालिकेमार्फत 24×7 एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 7722060999 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे. नागरिकांना या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लिकेज, पाईपलाईन फुटणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी विभागास प्राप्त होत आहे. त्यास अनुसरून आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत 24×7 एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 7722060999 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे.

महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांनी पाण्यासंदर्भात आपल्या काही तक्रारी असतील त्या 7722060999 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तक्रारी नोंदवाव्यात. या तक्रारींचे निरसन करण्यास पाणीपुरवठा विभाग कटीबध्द आहे. आपल्या तक्रारीचे वेळेत निरसन होईल, याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील राहील. तसेच उपलब्ध पाणी जपून वापरावे. घरातील, इमारतींमधील, सोसायट्यांच्या आवारातील पाण्याची गळती (Leakages) बंद करावी. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. तसेच रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेस कळवावे, असे आवाहनही महापालिकेने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.