Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी येलवाडी येथील तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट (Mahalunge ) तीनने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 22) सकाळी पावणे बारा वाजता खेड तालुक्यातील येलवाडी येथे करण्यात आली.

मेहपाल मुलतानाराम बिष्णोई (वय 25, रा. येलवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ahamdabad : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येलवाडी येथे अंगण हॉटेलच्या पाठीमागे एकजण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मेहपाल याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि तीन काडतुसे असा 53 हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी पिस्टल जप्त करत मेहपाल याला अटक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत (Mahalunge ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.