Ahamdabad : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन

एमपीसी न्यूज – वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक ( Ahamdabad ) पराग देसाई सकाळी फेरफटका मारायला गेले असता त्यांच्यावर  भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्या हल्ल्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात घसरून पडलेल्या देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अहमदाबाद येथे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Chikhali : चिखलीत नवरात्री महाउत्सवाची सांगता

पराग देसाई यांच्यावर मागील 7 दिवसापासून अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली. ते 49 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्च्यात पत्नी विदिशा देसाई, मुलगी परीशा देसाई असा परिवार आहे.

पराग देसाई हे वाघ बकरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे सुपुत्र होते. कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीची दीड हजार कोटींची उलाढाल आहे. 1995 मध्ये त्यांनी कारकीर्द सुरु केली ( Ahamdabad ) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.