Maharashtra : बारसू युनेस्कोच्या ‘जागतिक हेरिटेज वारसा स्थळांमध्ये’ ही बाब दुर्लक्षीत करण्याजोगी नाही – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज : बारसू (सिंधुदुर्ग) हा कोकण किनारपट्ट्यातील (Maharashtra) विविध ऐतिहासिक व प्राचीन भूगोलांचा मोठा समूह असून भारताच्या ‘पश्चिम घाट’ या कोकण प्रदेशातील बारसू हे ‘युनेस्कोच्या जागतिक हेरीटेज वारसा केंद्रात’ गणले जाते, ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले.

युनेस्को वारसा स्थळ यादीत समाविष्ट महत्त्वाच्या व पुरातन स्थळापैकी बारसूची 900 km rock art ही मोहेंजोदडो
समकालीन आहेत. यात युनेस्कोच्या कायदेशीर परवानगीखेरीज इथे काही करता येणे, कसे शक्य आहे? याची जाणीव करणारा इशारा देऊन केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने या बाबी हाताळाव्यात असेच काँग्रेसचे म्हणणे असल्याचे सांगितले.

यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांचे ‘वसुंधरा कोष’ वर केलेले United Nations मधील भाषण, ते पंतप्रधान असताना भारतातर्फे घेतलेली पर्यावरण पुरक भूमिका, व पर्यावरणाचे महत्व विषद करणारे, जगास केलेले आंतरराष्टीय आव्हान’ या भारताने ‘जागतिक पर्यावरण’ विषयी स्वीकारलेल्या धोरणात्मक बाबी, तथ्यपूर्ण व महत्त्वाच्या आहेत.

याचे उचित भान देशातील सत्ताधिशांनी ठेवणे गरजेचे आहे. पूर्वीच्या भारतीय पंतप्रधानांनी अर्थात स्व. राजीव गांधींनी घेतलेल्या या पर्यावरणीय हितैषी भूमिकेचे त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे कौतुक झाले होते. त्या जागतिक पर्यावरण हितैषी राष्ट्रीय भूमिकेला’ भारताकडूनच छेद देणारा नकारात्मक पर्यावरणीय निर्णय होऊ नये, असेच राष्ट्रीय धोरणात्मक बाब म्हणून काँग्रेसला वाटते.

बारसू येथील पठारात कोकणच्या किनारी पट्ट्यातील 62 भूगोलांचा हा सर्वात मोठा समूह असून माणसाचे आणि वाघांचे मोठे कोरीव काम आहे, अशा अनेक विविध भू आकृती, भू शिल्पाकृती, कातळ शिल्प तयार झाल्याचे पहायला मिळते..!

वाघांवरील पट्टे रेषांच्या मांडणीने बनवलेले असून आयताकृती आणि त्रिकोणात्मक भु-शिल्पाकृती तयार झाल्याचे समजते. वाघांच्या भौमितिक उपचारांच्या विरूद्ध, मानवी आकृतीचे डोके गोल, वक्र कंबर आणि गोलाकार पाय असतात. छाती भौमितिक अमूर्त फॉर्मसह दर्शविली आहे, अशा प्रकारच्या भूआकृती तयार झाल्याचे ही निदर्शनास येत असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.

मानवी धडाच्या डाव्या बाजूला मासे, ससा आणि मोर यांच्या आकृत्यांचे कातळ-शिल्पांचे चित्रणरुपी अस्तित्व आहे. विद्वानांनी हडप्पा संस्कृती-हडप्पा आणि मोहेंजोदाडोच्या उत्खनन केलेल्या ठिकाणांवरून नोंदवलेल्या सीलवर चित्रित केलेल्या आकृतिबंधासह या रचनेतील साम्य दर्शवले आहे, या सर्व ‘जागतिक प्राचिन ईतिहास व भारताची संस्कृती व ओळख दर्शवणारा आहे’…! याची दखल युनेस्कोने घेतल्याचे स्पष्टपणे आढळते. त्यामुळे प्राचिन भारतीय इतिहासाचा ठेवा जर नष्ट होण्याचे संकट संभाव्य रिफायनरीमुळे होणार असेल, तर याचा केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करायला हवा असे प्रतिपादन ही काँग्रेस राज्य प्रवक्त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारी करतात. कारण त्यातील तेल, घाण द्रव्य, रसायन, औषध, अनैसर्गिक वायू, समुद्रात सोडले जाते. त्यामुळे ‘पश्चिम किनारपट्टी घाटाचे भागातील कोकण परीसरातील (Maharashtra) समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढू शकते व त्यातील जीव वैविधता, मासे मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याचा धोका संभवतो. त्याच बरोबर मोठ्या बेकारीचे संकट ओढवू शकते. कोकण किनारपट्टी भागात मासेमारी हे कोकणातील मोठे रोजगाराचे साधन आहे. त्याचे उच्चाटन होण्याचा धोका संभवू शकतो.

माधव गाडगीळ अहवालानुसार तर पश्चिम घाटाची निसर्ग संपत्ती, जैवविविधता, आंबा, केळी, फणस, नारळ, सुपाऱ्या आदींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून हे उत्पादनातून देशात व विदेशात निर्यात होते. वास्तविक कोकण रेल्वेमुळे कोकण’चा कॅलीफोर्निया होण्याचे भाकीत होऊ लागले. मात्र तेल रिफायनरी प्रकल्पांमुळे कोकणातील ही नैसर्गिक संपत्तीच नष्ट होण्याचा धोका येऊ घातलाय काय? याच भावनेने स्थानिक नागरिक भयभीत होऊन मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत, ही वास्तवता देखील राज्य सरकारने समजून घेतली पाहिजे.

पश्चिम घाट असलेल्या भारताच्या महाराष्ट्रातील कोकणपट्टीतील जैवविविधता (Biodiversity) टिकवण्यासाठी, राज्यास रोजगार व महसूल देणारी मोठी नैसर्गिक संपत्ती आंबा, नारळ, केळी, फणस, काजू, सुपारी उत्पादन टिकवण्यासाठी  या भागात कोणतेही रसायन निगडीत प्रकल्प न करण्याचे पुर्वीच्या सरकारांचे धोरण’ असतांना देखील केंद्र सरकारचा दबाव व अट्टाहास का..?

Pune : पुणे- बेंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गुजरातला देखील मोठी समुद्र किनारपट्टी असताना तसेच युनेस्कोचे जागतिक हेरिटेज स्थाने नसताना तेथे मोठी रिफायनरी न करता, महाराष्ट्रातील कोकणचे अपरिमित नैसर्गिक नुकसान, रोजगार – महसूल आदीचे नुकसान करण्याचा (Maharashtra) घाट का घातला जात आहे? असा संतप्त सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विचारला.

पर्यवरणाची हानी करणाऱ्या रासायनिक प्रकल्पाऐवजी, कोकणातील नैसर्गिक संपत्ती व वातावरणाची जपणूक करत तेथे ‘आयटी पार्क’ देखील उभारून, मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. यावर खरे तर राज्य सरकारने विचार केला पाहिजे. राज्याचे हित जोपासणारे प्रकल्पांनाच मंजुरी दिली पाहीजे, असेही काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.